अळूच्या पानाची भाजी

अळूच्या पानाची भाजी

शिक्षण विवेक    20-Sep-2023
Total Views |

अळूच्या पानाची भाजी
शास्त्रीय नाव : Colocasia esculenta
साहित्य : अळूची पाने, बेसनपीठ, तेल, जिरे, तिखट, मीठ, हळद, हिंग, मिरची, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर
कृती :
1) सर्वांत प्रथम बेसनपीठ गव्हाच्या पिठासारखे मळून घ्यावे.
2) त्यात एक चमचा हळद, एक चमचा मीठ मिसळून घ्यावे.
3) मळलेले बेसनपीठ अळूच्या पानावर पसरवून, त्वरित अळूची पाने गुंडाळून घ्यावीत.
4) नंतर अळूच्या पानाच्या गुंडाळी वाफेवर वाफवून तेलामध्ये टाळून घाव्यात आणि त्याचे बारीक तुकडे करावेत.
5) भाजी करण्यासाठी एक पसरले घेऊन त्यामध्ये, आपल्याला हवे तेवढे तेल, जिरे, तिखट, गरम मसाला, कांदा टाकून तळून घ्यावे आणि नंतर त्यामध्ये अळूचे तुकडे टाकून एक उकळी घ्यावी. अशा प्रकारे अळूच्या पानाची भाजी तयार होईल.
- सारिका रामदासी,
श्री. चिंतेश्‍वर मा.विद्यालय गेवराई.