छोटीशी चिमुकली मुंगी छान
लाल, काळ्या रंगाची मुंगी छान ॥1॥
साखर सांडताच
पळत पळत येते
तोंडात पकडून भिंतीवर चढते
चढता चढता
चक्कर येऊन पडते,
शेवटी एकदा घरी पोहोचते.
घरी पोहोचताच साखर खाते.
साखर खाताच झोपून जाते.
छोटीशी चिमुकली मुंगी छान,
लाल, काळ्या रंगाची मुंगी छान
- अर्ष कालेकर
नवीन मराठी शाळा, पुणे