ज्वारीच्या पिठाचे अप्पे

ज्वारीच्या पिठाचे अप्पे

शिक्षण विवेक    27-Sep-2023
Total Views |

ज्वारीच्या पिठाचे अप्पे
साहित्य : 1 कप ज्वारीचे पीठ, गाजर, ढोबळी मिरची, कोथंबीर, लसूण मिरची पेस्ट, लाल तिखट, मीठ, हळद, जिरे, दही, पाणी.
कृती : प्रथम एका भांडरात 1 कप ज्वारीचे पीठ घेणे. त्यात बारीक चिरलेल्या भाज्या, ढोबळी मिरची घालणे, कोथंबीर घालणे, दही पाव कप घालणे, मिरची पेस्ट अर्धा चमचा, जिरे, हळद आणि चवी प्रमाणे मीठ घालून, मिश्रण एकत्र करणे. मग थोडं थोडं पाणी घालून, मिश्रण मिक्स करून घेणे. मिश्रण 10 मिनिट मुरल्या नंतर, अप्पे करण्यास घ्यावे. खुशखुशीत अप्पे तयार होतील. हिरव्या खोबऱ्याच्या चटणी सोबत खाण्यास द्यावे.
- रेश्मा उकिर्डे, पालक,
कन्याशाळा, सातारा