छत्र्यांच्या गप्पा

छत्र्यांच्या गप्पा

शिक्षण विवेक    02-Jan-2024
Total Views |


छत्र्यांच्या गप्पा

फुटपाथवर छत्री दुरुस्ती करणार्‍या एका म्हातार्‍याकडे दुसरा माणूस एक छत्री घेऊन आला. त्या वेळी तिथे असलेली एक दुसरी छत्री तिच्याशी बोलू लागली. त्या दोघींचा हा संवाद...

पहिली छत्री : आई गंऽऽऽ, कपड्याच्या काड्या दुखू लागल्या आहेत. कधी एकदा नीट होते आहे, असं झालं आहे मला.
दुसरी छत्री : हो ना, मलासुद्धा तेच वाटतं, पण तुझी तब्येत इतकी कशी बिघडली?
पहिली छत्री : काय सांगू तुला? अगं, माझ्या घरात एक द्वाड मुलगा आहे. वाट लावली त्याने माझी. सारखा उघडझाप करतो माझी. त्याच नादात गेल्याच आठवड्यात त्याने बटण तोडलं माझं. या घरात येऊन पंधरा दिवससुद्धा झाले नाहीत. तुझी ही दुरावस्था कशामुळे झाली?
दुसरी छत्री : अगं, घरोघरी मातीच्या चुली! तुला तोडलं लहान कार्ट्याने, मला तोडलं म्हातार्‍याने.
पहिली छत्री : ते कसं काय?
दुसरी छत्री : ऐक तर खरं! त्याचं झालं असं की, आजोबांना जायचं होतं देवळात. त्यांना सापडेना त्यांची काठी. मग काय, घेतलं मला हाताशी! रस्त्याने चालताना आजोबा घसरले केळीच्या सालीवरून अन् आम्हा दोघांचंही कंबरडं मोडलं बघ. ते गेले त्यांच्या दवाखान्यात आणि मी आले इकडे, या माझ्या दवाखान्यात.
पहिली छत्री : अगगं! तसं आपलं आयुष्य पावसाच्या चार महिन्यांचं! एरवी आपल्याला कोण विचारतं!
दुसरी छत्री : सध्या ‘यूज अ‍ॅण्ड थ्रो’चा जमाना आहे. असो, नशीबातल्या गोष्टी कोणाला टळल्यात. ज्याला जीवन आहे, त्याला मृत्यू असणारचं!
पहिली छत्री : हो न, आज आपण योगायोगाने भेटलो. जगलो, वाचलो, तर भेटू पुन्हा! चल, आता ते बघ आजोबा आले तुला घ्यायला. आता पुन्हा कंबरडे नाही मोडलं म्हणजे मिळवलं!
(दोन्ही छत्र्या मोठ्यामोठ्याने हसून एकमेकींचा निरोप घेतात.)

- प्राजक्ता राऊत, ९ वी,
महिलाश्रम हायस्कूल, पुणे