पक्षांची शाळा

पक्षांची शाळा

शिक्षण विवेक    03-Jan-2024
Total Views |

पक्षांची शाळा
एकदा भरली पक्षांची शाळा
मास्तर झाला काळा कावळा
मोर झाला हेडमास्तर
पिसारा फुलवून बसला खुर्चीवर
पोपटाने घेतला गणिताचा तास
सोडवायला दिले गणित खास
एक पेरू चार आण्याला
चार पेरू किती आण्याला?
चिऊताई आल्या ठुमकत ठुमकत
विचारू नका त्यांची करामत
कोकिळेने दिली एक तान
बगळ्याने केली उंचच मान
इतक्यात उशीरा बदक आले
कबुतरने केले गुटुर्र गुऽऽ
शाळा सुटली पळा रे धुम!!
 
- आरुषी भंडारे,
केशवराज प्राथमिक विद्यालय, धर्माबाद