26 जानेवारी 2024 - 75 वा प्रजासत्ताक दिन

नू.म.वि. प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 26 जानेवारी 2012 रोजी 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला.

शिक्षण विवेक    31-Jan-2024
Total Views |

26 जानेवारी 2024 - 75 वा प्रजासत्ताक दिन

26 जानेवारी 2024 - 75 वा प्रजासत्ताक दिन

नू.म.वि. प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 26 जानेवारी 2012 रोजी 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे आचार्य शाहीर हेमंत राजे मावळे आणि नूमवि कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीत प्रथम आलेला विद्यार्थी चिरावतककरण श्रीमंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पाप्रसंगी मंचावर माजा समिती अध्यक्ष मा. श्री. पराग ठाकूर सर, प्र. मुख्याध्यापिका मा स्मिता कागुणे मॅडम, इतर पदाधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि माजी भूमवीप मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

ध्वजारोहण झाल्यानंतर ध्वजाला मानवंदना दिली गेली आणि राष्ट्रगीत सादर केले गेले. त्यानंतर "विजयी विश्व तिरंगा प्यारा आणि बलसागर भारत होवो' ही देशभक्तीपर गीते मुलांनी सादर केली. या गीतांना श्री जापदे सर व सौ साखरे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले होते विद्यार्थी आणि प्रमुख पाहुणे यांचे मनोगत झाले. आचार्य शाहीर हेमंत राजे मावळे यांनी देशभक्ती आणि शिवभक्ती पाच्या सुरेख संगमाचे दर्शन आपल्या भाषणातून मुलांना घडविले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन NCC शिक्षक श्री साळवी सर यांनी केले होते. श्री यमगर सर यांनी प्रशालेच्या आवारात सुंदर रांगोळी साकारली होती.

प्र. मुख्याध्यापिका कागुणे मैडम यांनी भारताचा विश्वगुरु बनण्याचा प्रयत्र चालू आहे, हे सांगताना भजनी राम हृदयी रामः या शि.प्र. मंडळीच्या मार्गदर्शनाने नू. म. वि. प्रशालेत भरविलेल्या कार्यक्रमाचा उल्लेख केला. याप्रसंगी त्यांनी मुलांना भारताला समर्थ बनवण्यासाठी आदर्श नागरिक बनण्याचे आवाहन कते.

शालासमिती अध्यक्ष मा. पराग ठाकूर सर यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल कृतज्ञता व आदर व्यक्त करत वन देश वन मिशनः कृतीत आणण्याचा आपण प्रपत्र करूया असे सांगितले.

शेवटी आवाजाता सतामी आणि राष्ट्रगीत वंदे मातरम होऊन हा सुरेख कार्यक्रम संपत्र झाला.