दिनांक 22 जानेवारी अखंड भारत रामसेवेत रमलेला.

दिनांक 22 जानेवारी अखंड भारत रामसेवेत रमलेला.

शिक्षण विवेक    01-Feb-2024
Total Views |
 
एक पान राम नाम
 
दिनांक 22 जानेवारी अखंड भारत रामसेवेत रमलेला. सगळीकडे राम स्वागताची एकच धांदल.सगळं जग अयोद्धेचा तो सोहळा पाहण्यासाठी आतुरले होते. आम्ही आमच्या मुलांनी हा सोहळा याची देही याची डोळा पहला याचे फार विशेष वाटत.
 500 वर्षानंतर आपले मर्यादा पुरुषोत्तम राम आपला राजा परत एकदा सिहासनाधिश झाला. समस्त हिंदू एक झाले परत एकदा आपण हिंदुस्थानात राहत आहोत याची जाणीव झाली. सगळीकडे भक्ती चा महापूर आला होता. पण मला वाटत राजा श्रीराम म्हणजे जणू आस्तिक नास्तिक यातील दरी मिटवून सर्वाना एकत्र एकाच वाटेवरून नेणारा आपला राजा... असे सगळे राममंय झाले असताना आमच्या मुलांची नवीन मराठी शाळा मागे कशी राहील? 22 जानेवारी चा खास अभ्यास होता एक पान जय श्रीराम लिहून आणा. हा अभ्यास.. आणि सगळ्या मुलांनी आणले लिहून. खरच ही रामभक्ती या छोट्या पहिली दुसरी च्या मुलांकडून अभ्यासाचं नाव देऊन अगदी नकळत नवीन मराठी शाळाच करू शकते. मला खूप अभिमान वाटला कि माझा मुलगा अशा शाळेत शिकतो जिथे भक्ती - शक्ती आणि विज्ञान याचा पाया अगदी घट्ट केला जातोय. आमची मुलं नक्कीच मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचे गुण आत्मसात करतील यात शंकाच नाही. "नवीन मराठी नवीन मराठी शाळा आमची शिस्तीची शूरवीर होऊनि सेवा करू या देशाची.." 
 
शिल्पा गोडसे -पालक
नवीन मराठी शाळा -पुणे