रमणबाग प्रशालेत आयोजित करण्यात आला इयत्ता दहावीचा शुभेच्छा समारंभ

रमणबाग प्रशालेत आयोजित करण्यात आला इयत्ता दहावीचा शुभेच्छा समारंभ

शिक्षण विवेक    10-Feb-2024
Total Views |
 
रमणबाग प्रशालेत आयोजित करण्यात आला इयत्ता दहावीचा शुभेच्छा समारंभ
रमणबाग प्रशालेत आयोजित करण्यात आला इयत्ता दहावीचा शुभेच्छा समारंभ 
 
शुक्रवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत शालांत परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात शुभेच्छा गीताने झाली. राधिका देशपांडे यांनी लिहिलेल्या गीताला संगीत शिक्षक हर्षद गाडगीळ यांनी स्वरबद्ध केले. शुभेच्छा गीताचे गायन तनय नाझीरकर याने केले. रमणबाग प्रशालेचे नामवंत माजी विद्यार्थी; ज्येष्ठ सनदी लेखापाल.दत्ताजी काळे कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देण्याच्या दृष्टीने शालांत परीक्षेतील गुण अत्यंत महत्त्वाचे असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास करून परीक्षेला सामोरे जावे असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. प्रशालेच्या शालाप्रमुख मनिषा मिनोचा यांनी प्रास्ताविकातून शाळेने दिलेल्या शिक्षण व संस्कारांची शिदोरी घेऊन विद्यार्थ्यांनी परीक्षेत व जीवनात यशस्वी व्हावे, अशा शुभेच्छा दिल्या. शालासमितीचे अध्यक्ष आणि प्रशालेचे नामवंत माजी विद्यार्थी डॉ.शरद अगरखेडकर यांनी शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या विद्यार्थ्यांनी शालांत परीक्षेला सकारात्मक दृष्टीने कसे सामोरे जावे, या विषयक मार्गदर्शन केले. प्रशालेतील शिक्षकांच्या वतीने मोहन शेटे, दिपाली चौघुले, दिपाली सावंत या शिक्षकांनी, तसेच रितेश भरडे या विद्यार्थ्याने पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या. सुहास देशपांडे व महेश जोशी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसंबंधी महत्त्वाच्या सूचना दिल्या.रोहन चोरडिया, सोहम जोशी, गणेश देवरमनी, राज देवरे या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पर्यवेक्षक सुरेश वरगंटीवार यांनी आभार प्रदर्शन केले, तर चंद्रशेखर कोष्टी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास सर्व पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर व विद्यार्थी उपस्थित होते.