मार्केट डे

बाजारहाट दिन

शिक्षण विवेक    12-Feb-2024
Total Views |

मार्केट डेशुक्रवार, दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजी, टिळक रोड वरील डेक्कन एजुकेशन सोसायटीची मुरलीधर लोहिया पूर्व प्राथमिक शाळेत मार्केट डे (बाजारहाट दिन) मोठ्या उत्साहात साजरा झाला. शाळेतील मुलेच विक्रेते आणि ग्राहक होते. गाजर, मटार, मेथी, पालक, कोथिंबीर, कांदे, बटाटे इत्यादी भाज्या विकण्यास होत्या. शेजारीच एटीएम मशीनची प्रतिकृती तयार होती. मुले भाजीविक्रेत्याच्या वेशभूषेत आली होती. मुलांनी भाजी खरेदी करण्यासाठी कापडी पिशवी आणली होती. आपल्याकडून भाजी घ्यावी, म्हणून जोरजोरात ओरडत होती. तसेच आपल्या आवडीची भाजी विकत घेण्यास मुलांना आनंद वाटत होता. मुलांना प्रत्यक्ष भाज्यांची ओळख व्हावी, खरेदी-विक्री माहित व्हावी या हेतूने हा उपक्रम माधुरी बर्वे यांच्या नेतृत्वाखालील पार पडला.