रमणबाग शाळेत सायबर सुरक्षा या विषयावर विद्यार्थी व पालकांसाठी व्याख्यान

रमणबाग शाळेत सायबर सुरक्षा या विषयावर विद्यार्थी व पालकांसाठी व्याख्यान

शिक्षण विवेक    13-Feb-2024
Total Views |
 
'सायबर सिक्युरिटी व फॉरेन्सिक
रमणबाग शाळेत सायबर सुरक्षा या विषयावर विद्यार्थी व पालकांसाठी व्याख्यान
शनिवार दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत विद्यार्थी व पालकांसाठी 'सायबर सुरक्षा 'या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 'सायबर सिक्युरिटी व फॉरेन्सिक' या विषयातील तज्ज्ञ श्री.हेमंत देशमुख यांनी आपल्या व्याख्यानातून सोशल मीडिया, इंटरनेट यांचा योग्य उपयोग कसा करावा, अति महत्त्वाची, गोपनीय व संवेदनशील माहिती हॅक करून त्याचा गैरवापर करण्याचे सायबर गुन्हे कसे घडतात, सायबर गुन्हेगारीचे गंभीर परिणाम काय आहेत तसेच सायबर सुरक्षा व साक्षरतेचे महत्व उपस्थितांना सांगितले. विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी सायबर सुरक्षा व साक्षरतेचे महत्व याबाबत सजग राहून सायबर गुन्हेगारी पासून स्वतःला व इतरांना दूर ठेवले पाहिजे असे मार्गदर्शन केले. शालाप्रमुख मा.मनिषा मिनोचा यांनी त्यांच्या प्रास्तविकातून असे प्रतिपादन केले की, शाळकरी मुले सोशल मीडिया व इंटरनेट यांच्या योग्य-अयोग्यतेची माहिती न घेता त्यांचा वापर करताना दिसतात. त्यामुळे नकळतपणे सोशल मीडियाचा गैरवापर तसेच सायबर गुन्हे विद्यार्थ्यांकडून घडू शकतात, म्हणूनच विद्यार्थ्यांना सजग करण्यासाठी सायबर सुरक्षा या विषयाची योग्य माहिती त्यांना असणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.प्रीती कड यांनी केले, तर आभार प्रदर्शन सारिका रणदिवे यांनी केले. अतिथींचा परिचय प्रतिभा जक्का यांनी करून दिला. कार्यक्रमास सर्व पदाधिकारी शिक्षक व शिक्षकेतर विद्यार्थी व पालक उपस्थित होते.