शासकीय रेखाकला इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत नूमविचा निकाल १००%

शासकीय रेखाकला इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत नूमविचा निकाल १००%

शिक्षण विवेक    14-Feb-2024
Total Views |

 शासकीय रेखाकला इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत नूमविचा निकाल १००%
शासकीय रेखाकला इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत नूमविचा निकाल १००%
शिक्षण प्रसारक मंडळीच्या नूमवि मुलांच्या प्रशालेचा इंटरमिजिएटचा निकाल १००% लागला आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून प्रशालेची उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेला एकूण १०५ विद्यार्थी बसले होते. एलिमेंटरी परीक्षेचा निकाल ९९% लागला आहे. १९ विद्यार्थी अ श्रेणी, ३१ विद्यार्थी ब श्रेणी, ५४ विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना एस. एस. सी. बोर्ड परीक्षेत इंटरमिजिएट परीक्षेचे वाढीव कलागुण अ श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांना ७ गुण, ब श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांना ५ गुण व क श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांना ३ गुण मिळणार आहेत. नूमवि प्रशाला शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षेचे केंद्र असून एकूण ४९१ विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे चित्रकला विभाग प्रमुख श्री दत्तात्रय वेताळ आणि सचिन रोणे यांनी मार्गदर्शन केले होते. शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष माननीय सदानंद फडके साहेब, शाला समिती अध्यक्ष पराग ठाकूर साहेब, प्रभारी मुख्याध्यापिका स्मिता कांगुणे, पर्यवेक्षक देवराम चपटे, संगीता काळे, लालबहादूर जगताप, दशरथ राजगुरू व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे
कौतुक व अभिनंदन केले .
 
प्रभारी मुख्याध्यापक,
नू. म. वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय पुणे - २.