माझा विद्यार्थी

माझा विद्यार्थी

शिक्षण विवेक    03-Feb-2024
Total Views |


माझा विद्यार्थी 

माझा विद्यार्थी
कोणती गोष्ट असो , ती माझी म्हटले की , त्यामागील त्याची भावना बदलते त्याच्याशी असलेले आपल नातं बदलते. माझा देश, माझी आई , माझा भाऊ , माझा विद्यार्थी , असं सगळ माझ माझ होत. त्याच्या वरती आपला अधिक हक्क अधिकार आहे असे वाटते. त्याचप्रमाणे माझा विद्यार्थी म्हटले की, तो कसा असावा, कसा घडवावा याबाबत आपली स्वतःची अनेक वेगवेगळी मत असतात.
जितकं प्रेम आपण आपल्या मुलावरती करतो तितकच प्रेम आपण आपल्या विद्यार्थ्यांवरही करतो. त्यांना समजावणे, समजून घेणे . त्यांच्यामध्ये संस्कार घडविणे हे कार्य शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये अविरत चालू असते. एखादा मुलगा खूप बोलका चुणचूणीत हजरजबाबीपणा असतो, तर एखादा नजर चुकून कोपर्‍यात बसणारा खूप कमी बोलणारा मितभाषी असा असतो. शिक्षकाबद्दल प्रत्येक मुलाचे मत वेगळे असते. कोणी आपल्याला बघून घाबरतात तर कोणी लाडात येतात. काहींच्या मनात आदर असतो तर काहींच्या मनात भीती.
प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे. आपल्या अभ्यासाचा फॉर्म्युला आपण लॉजिक सर्वांना सारखाच कसं बरं लागु होईल ? प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता ही वेगवेगळी असते वर्गात विद्यार्थ्यांमध्ये कोणी पाहिला तर कोणी शेवटचा असतो . आपल्याला प्रत्येक मुले ही ओळखता आली पाहिजे. त्यांच्या क्षमता, त्यांचा कल पाहून त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करायला हवेत. खर तर स्पर्धा, शर्यत ही एकमेकांत नकोच प्रत्येकाचा एक वेगवेगळा कला असतो, कोणी अभ्यासात तर कोणी खेळत , कोणी गायनात तर कोणी इतर कलागुणांमध्ये पारंगत असतात.
प्रत्येकाचे व्यक्तिमत्व वेगळे आहे . आणि ते वेगळेपणाने खुलवण्यासाठी आपण त्यामध्ये अधिकचे खतपाणी घालून सुप्त कलागुण वाढविण्यासाठी सहकार्य करावे . आपण कोणी देव नाही जे सगळं एक क्षणात बदल घडवून आणू शकतो . परंतु आपल्याला जे कर्म करायची आहे ते आपले आद्य कर्तव्य आहे . त्याकडे लक्षपूर्वक चौकस बुद्धीने पाहायला हवे.

आपल्या हातुन घडलेल्या ज्ञानदानाचे काम आपल्याला प्रामाणिकपणे निष्ठेने करता यायला हवे. समाधान इतका असावं की कधी आयुष्य संपलं तरी पुन्हा पुढच्या जन्मी शिक्षकच व्हावे अशी भावना निर्माण होऊ माझा विद्यार्थी घडवण्यासाठी आपली धडपड चालुच ठेवायला हवी.
- अविनाश गर्डे, सहशिक्षक
कै.दत्ताजी भाले प्राथमिक विद्यालय, अंबड