सृजनाला पंख नवे

तृणधान्य जनजागृती प्रदर्शन

शिक्षण विवेक    05-Feb-2024
Total Views |
 
सृजनाला पंख नवे - तृणधान्य जनजागृती प्रदर्शन
सृजनाला पंख नवे - तृणधान्य जनजागृती प्रदर्शन
 
भारतीय आहारातील भरड धान्याचे महत्व, भरड धान्यापासून तयार होणारे पदार्थ आणि आरोग्याला होणारा फायदा याबद्दल जनजागृती करण्यासाठी सोमवार दिनांक २९/१/२०२४ रोजी सौ.विमलाबाई गरवारे प्रशालेच्या आवारात तृणधान्य जनजागृती प्रदर्शन भरविण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन प्रशालेचे माजी विद्यार्थी व जेडब्ल्यू कन्सल्टन्सी चे संचालक श्री.निखिल जोशी (१९९७ बॅच) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशालेचे महामात्र श्री.सुधीर गाडे शिक्षण प्रबोधिनीचे उपसंचालक श्री.केदार तापीकर तसेच शिक्षण मंदिर भांडारकर रोड प्रशालेच्या माननीय मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम उपस्थित होत्या.
या प्रसंगी अन्नपूर्णा देवीचे पूजन करून मिलेट गीताने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत झाले. ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी मिलेट क्रांती पथनाट्य यावेळी सादर केले. ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राजगिरा, कोडो,सातू अशा विविध तृणधान्यांनी सजलेले हे प्रदर्शन खूपच देखणे होते. भरड धान्यापासून तयार केलेले पदार्थ विक्रीसाठीदेखील ठेवण्यात आले होते. पालकांना व परिसरातील शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रदर्शन पाहण्यासाठी दोन दिवस खुले ठेवण्यात आले होते.