वनभोजना'त रमले रातवडचे विद्यार्थी, निसर्गाच्या सानिध्यात भोजनाचा आनंद.

वनभोजना"त रमले रातवडचे विद्यार्थी, निसर्गाच्या सानिध्यात भोजनाचा आनंद.

शिक्षण विवेक    06-Feb-2024
Total Views |
 
 वनभोजना'त रमले रातवडचे विद्यार्थी, निसर्गाच्या सानिध्यात भोजनाचा आनंद.
 
वनभोजना'त रमले रातवडचे विद्यार्थी, निसर्गाच्या सानिध्यात भोजनाचा आनंद.
- निसर्गातील विविध अनुभव देवून व्यक्तिमत्व विकसित करणाऱ्या माध्यमिक विद्यामंदिर रातवडच्या विद्यार्थ्यांनी बुधवार दि. 31 जानेवारी रोजी वनभोजनाचा आनंद घेतला.
शालेय परिसरातील वनात एक दिवस स्वतः जेवण बनवून आपल्या वर्गासहित सर्व शाळेने एकत्रित भोजनाचा आनंद घेतला.निसर्ग संपन्न आनंद देणाऱ्या माध्यमिक विद्यालय रातवडचे विद्यार्थी शालेय परिसरातील वनात पूर्ण दिवसभर रमले. सकाळ पासून गर्द झाडित विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे भोजन बनविण्याचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी वनभोजनाची स्वतः तयारी करून विविध प्रकारचा भाजीपाला, धान्य व इतर साहित्य स्वतः विद्यार्थ्यानी बाजारातून खरेदी केले. विविध प्रकारच्या रेसिपी यूटयूब व पालकांकडून विचारून व समजावून घेतल्या व वनभोजनात विविध प्रकारच्या पाककृती बनविल्या.
सकाळपासून विदयार्थ्यांनी निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनूभव घेतला. स्वायंपाकातील विविध प्रकारच्या कामांचा अनूभव व आनंद घेतला. भोजन तयार झाल्यानंतर वर्गवार बनविलेल्या भोजनाचे परिक्षण करण्यात आले. परिक्षणानंतर सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे भोजन मंत्र म्हणून भोजनाचा आनंद घेतला. भोजनानंतर स्वयंपकाची भांडी स्वच्छ करून परिसराची स्वच्छता केली.
अत्यंत आनंदात एक दिवस निसर्गात वनभोजनाचा अनूभव सर्व शाळेने मनमुराद घेतला. या अनुभवातून विद्यार्थ्यांना निसर्गाची माहिती झाली. स्वतः हाताने भोजन करण्याचा अनुभव मिळाला व एकत्रितपणे भोजनाचा आनंद झाला. ज्ञानरचनावाद व प्रत्यक्ष अनुभूतीतून शिक्षण देण्याच्या विद्यालयाच्या या उपक्रमात विद्यालयातील मुख्या. म.स.जाधव सर्व शिक्षकवृंद व पालकांचे नियोजन व सहकार्य लाभले.
फोटो ओळ -
वनभोजन करताना विध्यार्थी.