मराठी राजभाषा दिन उत्साहात ....

म.ए.सो. सौ.विमलाबाई गरवारे प्रशालेत मराठी राजभाषा दिन संपन्न

शिक्षण विवेक    11-Mar-2024
Total Views |
 
मराठी राजभाषा दिन
   म.ए.सो. सौ.विमलाबाई गरवारे प्रशालेत मराठी राजभाषा दिन व कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ समाजसेविका श्रीम. अनघा ठोंबरे व श्रीम. लता त्र्यंबके मॅडम या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या होत्या.
प्रशालेच्या विद्यार्थिनींनी कवी कुसुमाग्रजांची माहिती व राजभाषा दिनाची माहिती सुंदररित्या सांगितली. काही विद्यार्थिनींनी कवितेचे अभिवाचन केले. मराठी बोलीभाषा दर कोसावर बदलते हे दर्शविणारे नाटक इयत्ता पाचवी व सहावीतील विद्यार्थी- विद्यार्थ्यांनी सादर केले. पाचवीतील विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर केले. त्यानंतर इयत्ता आठवी व नववी मधील विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या वेगवेगळ्या कवितांचे सादरीकरण केले.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना मराठी भाषेमध्ये कविता रचण्यास उद्युक्त केले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री .भारमळ सर यांनी त्यांच्या अनमोल मार्गदर्शनामध्ये मातृभाषा शुद्ध स्पष्ट असायला हवी असे विद्यार्थ्यांना आवाहन केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हे देखील विद्यार्थ्यांनीच केले. कार्यक्रमप्रसंगी सर्व शालेय पदाधिकारी व 5वी ते 10वी चे विद्यार्थी उपस्थित होते