शिक्षणविवेक मार्च २०२४ अंकाचे विमोचन......

श्री. खोलेश्वर प्राथमिक विद्यालय अंबाजोगाई येथे शिक्षणविवेक मार्च २०२४ अंकाचे विमोचन

शिक्षण विवेक    11-Mar-2024
Total Views |

शिक्षणविवेक मार्च २०२४  अंकाचे विमोचन......
 दिनांक ९ मार्च २०२४ रोजी शिक्षणविवेक मार्च २०२४ दहाव्या अंकाचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. अप्पाराव यादव सर, विभाग प्रमुख श्री.चौरे सर व शिक्षणविवेक प्रमुख श्री.राठोड सर सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. या अंकामध्ये शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री. अप्पाराव यादव सर यांचा पेज नंबर १६ वर पित्रतुल्य व्यक्तिमत्व अप्पाराव यादव! यांच्या जीवनावर आधारित शाळेतील सहशिक्षिका सौ. दिपाली ताई आकनगिरे यांनी लिहिलेला सुरेख लेख प्रकाशित झाल्या बद्दल ,त्यांचे शिक्षक बंधू भगिनींनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या!