या वार्षीपासून कॉपीमुक्त परीक्षेचा निर्धार

दहावी-बारावी परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी एसएससी-एचएससी बोर्डाचा नवा पॅटर्न

शिक्षण विवेक    23-Jan-2025
Total Views |


कॉपीमुक्त परीक्षेचा निर्धार
 
 
या वर्षीपासून कॉपीमुक्त परीक्षेचा निर्धार
 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदाच्या वर्षी दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी नवा पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक आणि केंद्र संचालक आता दुसऱ्या शाळा महाविद्यालयातील असणार आहेत.

दरवर्षी राज्यभरात कॉपीमुक्त अभियान राबवले जाते. त्या अंतर्गत हा बदल करण्यात आला आहे. पाच ते सात किलोमीटर अंतरावरील शाळांमधील शिक्षक विविध परीक्षा केंद्रांवर पर्यवेक्षक असतील.वेळप्रसंगी जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांचीही मदत घेतली जाणार आहे. एसएससी-एचएससी बोर्डाने या वर्षीपासून सरमिसळ पद्धतीचा अवलंब केला असून हा निर्धार पूर्णत्वास जाईल अशी चिन्हे दिसत आहेत. त्यादृष्टीने शालेय स्तरावरही हालचाली सुरू झाल्या आहेत.