शिक्षणविवेक आणि मुकुंद भवन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षण माझा वसा २०२५ हा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार सोहळा शनिवार, दि. १८ जानेवारी २०२५ रोजी गणेश सभागृह, न्यू इंग्लिश स्कूल, पुणे येथे ५ ते ७ या वेळेत आयोजित करण्यात आला होता. मिलिंद सबनीस, शिल्पा सबनीस आणि
बाबासाहेब शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुरस्कार वितरण आणि श...शिक्षणाचा हा समूह गीत गायन कार्यक्रम असे या पुरस्कार सोहोळ्याचे स्वरूप होते.
शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यामध्ये त्यांनी शिक्षण माझा वसा या पुरस्काराचे स्वरूप स्पष्ट केले. तसेच बाबासाहेब शिंदे आणि मिलिंद सबनीस यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुरस्कार देत असतानाच पुरस्कार्थीवरील चित्रफित दाखवली गेली, तसेच शिक्षकांच्या कार्याची माहिती देण्यात आली. श...शिक्षणाचा या समूह गीत गायन कार्यक्रमामध्ये पुण्यातील न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, अहिल्यादेवी प्रशाला, रेणुका स्वरूप प्रशाला, न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, विद्यापीठ हायस्कूल, मा.स. गोळवलकर गुरुजी विद्यालय, शिशुविहार प्राथमिक शाळा या ७ शाळांनी सहभाग घेतला होता. शिक्षण या संकल्पनेवर आधारीत गाण्यांची सादरीकरणे झाली. या कार्यक्रमातील सहभागी विद्यार्थी आणि शिक्षकांचे सत्कार करण्यात आले. तसेच पुरस्कार निवड समितीतील प्राजक्ता वैद्य आणि शारदा पानगे यांचाही सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमासाठी संगीत साथ करणार्या समद पठाण, अभिजित यादव, पराग पांडव आणि आदिती गराडे या सर्व वादकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या मावजेकर आणि देवव्रत वाघ यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर आणि त्यांचे सहकारी वैष्णवी पठारे, गिरीश चिवटे, मानसी झोरे, चेतन मॅडम, प्रदीप पिंगळे, सिद्धी सावंत, दिव्या मावजेकर, देवव्रत वाघ, वैष्णवी भंडगे, हर्षवर्धन पाडुळे आणि सुषमा धामणसकर यांनी केले होते.
समग्र वंदे मातरमने या पुरस्कार प्रदान सोहळ्याची सांगता झाली.