महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत इयत्ता १२ वी व इयत्ता १० वी ची परीक्षा फेब्रुवारी-मार्च दरम्यान घेण्यात येणार आहेत. या परीक्षांच्या कालावधीत परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पुर्ण राज्यात ‘‘कॉपीमुक्त अभियान’’ राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियान शपथ दिली जाणार आहे.
शपथ-
मी शपथ घेतो की, मी फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या इ. १० वी व इ. १२ वी परीक्षेस परिपूर्ण अभ्यास करूनच सामोरे जाईन. मी उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही किंवा परीक्षेपूर्वी गैरमार्गाचा विचारही करणार नाही.
जर कोणी गैरमार्गाचा विचार करत असेल तर त्यास गैरमार्गांपासून परावृत्त करेन. परीक्षेला सामोरे जाताना मंडळ सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करेन. मी सातत्याने अभ्यास करेन व प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करेन. तसेच परीक्षेस आत्मविश्वासाने, निर्भिडपणे, तणावविरहित सामोरे जाईन व चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊन माझ्या शाळेचे, आई वडीलांचे व गुरूजनांचे नाव उज्ज्वल करेन.
जय हिंद जय महाराष्ट्र
कॉपीमुक्त अभियान शपथ म्हणजे विद्यार्थी कॉपी न करण्याची शपथ घेतात या अभियानाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये कॉपी न करण्याची सवय निर्माण करणे हा आहे. या अभियानात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सहभागी होतात.
कॉपीमुक्त अभियानामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल होते.
कॉपीमुक्त अभियानामुळे परीक्षा तणावरहित वातावरणात पार पाडता येते.
कॉपीमुक्त अभियानामुळे विद्यार्थ्यांना कॉपी प्रतिबंध अधिनियमाबद्दल माहिती मिळते.
शाळा परिसरात कॉपीमुक्ती घोषवाक्यांची जनजागृती फेरी काढणे.
ग्रामसभा बैठकीत कॉपीमुक्त अभियानाबाबत माहिती देणे.
कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन करणे.