म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेची नाट्यवाचन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी

शिक्षण विवेक    01-Oct-2025
Total Views |

म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेची नाट्यवाचन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची भावे प्राथमिक शाळा, पुणे आणि १९८८ सालचे इयत्ता ४ थी (अ) चे माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आशिष चांदोरकर स्मृती करंडक आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धेत भावे प्राथमिक शाळेने उल्लेखनीय कामगिरी केली.
इयत्ता १ ली ते ४ थी गटामध्ये झालेल्या या स्पर्धेत भावे प्राथमिक शाळेने तृतीय क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे शाळेतील कु. तन्वी मोटे हिने उत्कृष्ट सादरीकरण करून उत्कृष्ट वाचक पुरस्कार पटकावला .
बक्षीस वितरण समारंभ माजी विद्यार्थी सिद्धार्थ महाशब्दे व शाळेच्या महामात्रा डॉ . मानसी भाटे यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी १९८८ सालचे इयत्ता ४ थी (अ) मधील माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या यशामागे सहशिक्षिका श्रीमती रेणुका महाजन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
मा. मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड व मा. उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी विजेत्या विद्यार्थिनींचे तसेच मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती रेणुका महाजन यांचे कौतुक केले.