माझी प्रिय मैत्रीण
मैत्री नावासारखा पवित्र शब्द नाही
तुझ्यासारखी मैत्रीण या जगात नाही..!
तू भेटलीस मला, तेव्हा मैत्रितला ‘म’ कळाला..
हा ‘म’ कधी जीवाभावाचा झाला, मलाच नाही कळालं...!
तू टाकलेला खांद्यावर मैत्रीचा हात
माझ्यासाठी तिच होती प्रेमळ थाप..
आठवतील मला आपण केलेल्या गमती
त्याच असतील शेवटपर्यंत संगती..!
नेहमीच जीव लाऊ एकमेकीसाठी
आपल्या जीवापाड मैत्रीसाठी..!
तू लावलेला मैत्रीचा लळा
नाही विसरणार तुझा तो शब्द ‘अरे बाळा’
खूप काही ठेवायचे आहे आठवून
आठवणीचे भंडार ठेवायचे आहे साठवून ..!
आहे आपल्या मैत्रीवर कायम विश्वास
ठेवशील ना या मैत्रिणीला कायम लक्षात..!
नाव- माहेश्वरी विरभद्र वाडकर
इयत्ता- १० वी ,तुकडी –अ
शाळेचे नाव- कन्या शाळा वाई.