म .ए .सो .भावे प्राथमिक शाळेत महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंतीनिमित्त विविध उपक्रम.

म .ए .सो .भावे प्राथमिक शाळेत महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंतीनिमित्त विविध उपक्रम.

शिक्षण विवेक    17-Oct-2025
Total Views |

म .ए .सो .भावे प्राथमिक शाळेत महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंतीनिमित्त विविध उपक्रम .
म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
   कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून केली. त्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दोन्ही नेत्यांचे जीवनकार्य, विचार व कार्यतत्त्वे यांची माहिती देत त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी मूल्यांचा परिचय करून दिला.
   विद्यार्थ्यांनी गांधीजी व शास्त्रीजींच्या जीवनावर आधारित प्रसंगांचे नाट्यरूपांतर सादर केले. यातून सत्य, अहिंसा, स्वदेशी वस्तूंचा वापर, स्वच्छतेचे महत्त्व तसेच श्रमदानाची जाणीव याविषयी प्रभावी संदेश देण्यात आला.
   कार्यक्रमाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी वर्गखोली व शाळा परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेची सवय अंगीकारण्याचा संकल्प केला.
   या उपक्रमाचे कौतुक करत माननीय मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक केले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.