रातवड विद्यालयात साहित्य दीपोत्सव साजरा, किल्ला, आकाश कंदील, भेट कार्ड, गाणी , कवितात रमले विद्यार्थी

रातवड विद्यालयात साहित्य दीपोत्सव साजरा, किल्ला, आकाश कंदील, भेट कार्ड, गाणी , कवितात रमले विद्यार्थी

शिक्षण विवेक    18-Oct-2025
Total Views |
 
रातवड विद्यालयात साहित्य दीपोत्सव साजरा, किल्ला, आकाश कंदील, भेट कार्ड, गाणी , कवितात रमले विद्यार्थी
   शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानरचनावादी उपक्रम राबविणाऱ्या छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचालित माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयात दीपावली निमित्ताने विविध उपक्रम व साहित्य दीपोत्सवाचे आयोजन शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोंबर रोजी करण्यात आले होते.
   प्रथम सत्र परीक्षेनंतर साजऱ्या होणाऱ्या दीपावली उत्सवाचे औचित्य साधून विद्यालयात आकाशकंदील, भेटकार्ड व किल्ले बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थी सुट्टीला जाण्यापूर्वी शाळेने साहित्य दीपोत्सवाचे आयोजन केले होते. दिवाळी निमित्ताने परीक्षेनंतर दोन दिवस विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये इयत्ता पाचवी ते आठवीच्या विध्यार्थ्यांणी सहभाग घेतला. आकाशकंदील, भेटकार्ड व किल्ले विध्यार्थ्यांणी तयार केले.विध्यार्थ्यांणी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले व सर्व विध्यार्थी एकत्र येऊन बनविलेल्या किल्यांची सजावट करण्यात आली.
शुक्रवार रोजी विद्यालयात साहित्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक गीते, बालगीते, कविता, गाणी यांचे सादरीकरण केले. साहित्यिक हेमंत बारटक्के, विज्ञान मार्गदर्शक सुधीर पालकर , मुख्याध्यापक संतोष कदम यांनी या दीपोत्सवाचे उद्घाटन केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. हेमंत बारटक्के यांनी विविध कवितांचे वाचन करून दीपोत्सवाची माहिती सांगितली.
   अनेक विध्यार्थ्यांनी फटाके वाजवून व खाऊ वाटप करून आनंद व्यक्त केला .
छत्रपती श्री शिवाजी महाराज व मासाहेब जिजाऊ , श्री गणेश यांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारली होती . प्रतिकृती
रायगड किल्ल्यावर औक्षण करून छत्रपती शिवाजी महाराजांची ओवाळणी कऱण्यात आली.
   विद्यालयात प्रतिवर्षी दीपोत्सवाचे आयोजन केले जाते.विध्यार्थी स्वतःहून विविध उपक्रमात सहभागी होतात.विविध किल्यांची पुस्तके पाहतात व आवडलेला किल्ला बांधतात. किल्य्यासाठी लागणारे साहित्य परिसरातून जमा करतात व आकर्षक अशी सजावट रोषणाई करतात.
   विद्यालयाच्या या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार जोशी , सरचिटणीस डॉक्टर निलेश रेवगडे , शालेय समिती अध्यक्ष संजय पालकर व विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष कदम यांचे मार्गदर्शन लाभले.विद्यालयातील शिक्षक राजेन्द्र भगत यांनी किल्ला बनविण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर अशी किल्ल्याची प्रतिकृती बनवली होती तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षिका यांनी आकाश कंदील व भेटकार्ड विषयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेत राबविलेल्या या उपक्रमातुन प्रेरणा घेऊन अनेक विध्यार्थ्यांणी आपापल्या घरीसुद्धा किल्ले व आकाशकंदील बनविले .घरी बनविलेल्या आकाशकंदील व किल्यांमुळे पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
   विद्यालयाचे शिक्षक रायगड विभाग साहित्य प्रमुख अजित शेडगे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन ,सूत्रसंचालन केले .सांस्कृतिक प्रमुख डॉक्टर शारदा निवाते यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये विद्यालयात साहित्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते सुधीर पालकर यांनी विद्यार्थ्यांना दीपोत्सवानिमित्त फराळ दिला.