
माझे आजी आजोबा खूप भारी आहेत, कारण ते माझ्यासोबत वेळ घालवतात. मी जे मागेन त्या वस्तु खरेदी करून देतात, कधी-कधीतर माझ्या सोबत खेळतात.. पण, मला बाहेर फिरायला पण घेऊन जातात. ते माझे खूप लाड करतात. कधी-कधी दोघे भांडतात सुद्धा, माझ्यासोबत मग मी रूसले की नकळत, माझा अबोला तोडतात. माझी आजी तर मला बळजबरिनं जेवण देते, पण ती ताटात खूप वाढते, आणि मग मला ते अन्न फेकू सुद्धा वाटत नाही. पण त्यामागे तिचे प्रेम आहे. माझे आजी-आजोबा रोज मला लवकर उठवतात व चालायला नेतात. पण स्वत:च दमतात. प्रत्येक सणाला मला नवीन ड्रेस, किंवा ज्वेलरी, घेतात. ते माझी खूप काळजी घेतात. मला जास्त त्यांच्यासोबत रहावेसे वाटते, जर मला आई ओरडली तर तेच, माझी बाजू घेतात..! आणि नंतर समजावून सांगतात. खरंच मला असे आजी-आजोबा मिळालेत, यातच माझा आनंद आहे. माझे आजी-आजोबा शेतात दिवसभर काम करतात, ते खूप दमतात. मग मी रोज रात्री त्यांचे पाय चेपून देते.. एवढं तरी करूच शकते ना मी..? ते माझी एवढी काळजी घेतात ना, मग मी पण त्यांची काळजी घेतली तर काय फरक पडतो..! पण जर आजोबा रागात असले तर खूपच डेंजेर दिसतात.. पण इतर वेळी ते खूप शांत असतात.. जर माझी आणि माझ्या भावाची भांडणं झालीत की दोघे सुद्धा आमची भांडणं मिटवतात.. खरंच असे आजी-आजोबा. सर्वांना भेटले पाहिजेत...! माझे आजी-आजोबा इतर लोकाना सुद्धा मदत करतात, माझे आजोबा कधी-कधी, नदीला गाई धुवायला जातात.. तेव्हा मला सुद्धा नेतात, आजी पण येते, आमच्या सोबत. आमच्या घराच्या बाजूलाच आमच्या गाईचे शेड आहे.. तिथे आम्ही आमच्या गाई बांधतो. आणि सकाळी-संध्याकाळी, त्यांचे दूध काढतो व ते डेरीत घालतो...! माझे आजी-आजोबा सर्वात जास्त प्रेम फक्त माझ्यावरच करतात.. माझंही त्यांच्यावर खूप प्रेम आहे..! ए बाप्पा माझ्या आजी-आजोबांना कधीच माझ्यापासून लांब नेऊ नकोस, कारण ते माझे सुपर आजी-आजोबा आहेत..!
नाव-मानसी हेमंत गायकवाड
इयत्ता- ९वी तुकडी-अ
शाळेचे नाव- कन्या शाळा, वाई