म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत इतिहास विषयाची आवड निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांना किल्ल्यांविषयी माहिती मिळावी . या उद्देशाने किल्ले तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपली कल्पकता, कलाकौशल्य आणि परिश्रम यांचा सुंदर संगम घडवून आणला. विद्यार्थ्यांनी पुठ्ठा, माती, कागद, रंग व इतर पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून विविध ऐतिहासिक किल्ल्यांचे आकर्षक नमुने तयार केले.विद्यार्थ्यांनी किल्ल्यांबरोबर त्याची माहिती , इतिहास आणि वैशिष्ट्येही सादर केली. 'कुटुंब प्रबोधन ' उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या घरातील सर्व सदस्यांनी या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना मदत केली .विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये कुटुंबातील सर्वांचा सहभाग असावा हा या मागचा हेतू होता .
स्पर्धेत मुलांनी तयार केलेल्या किल्ल्यांमध्ये राजगड, तोरणा, सिंहगड, प्रतापगड, रायगड ,मुरुड - जंजिरा अशा अनेक प्रसिद्ध किल्ल्यांच्या सुंदर प्रतिकृती पाहायला मिळाल्या. या सादरीकरणातून विद्यार्थ्यांचा इतिहासावरील प्रेमभाव आणि सर्जनशीलता स्पष्टपणे दिसून आली.
या स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे आहेत :
इयत्ता तिसरी :
प्रथम क्रमांक – रेवांश राजेंद्र गांडले ( ३री चित्रा)
द्वितीय क्रमांक – अवधूत दिगंबर पवार ( ३ री अनुराधा)
तृतीय क्रमांक – स्वराज अभिजीत कांबळे ( ३ री अश्विनी)
इयत्ता चौथी :
प्रथम क्रमांक – श्री संतोष सवने (४ थी भानू)
द्वितीय क्रमांक – काव्या गजेंद्र हेगडे (४ थी दिनकर)
तृतीय क्रमांक – शिव समीर जाधव (४ थी दिनमणी)
विद्यार्थ्यांच्या किल्ल्यांचे परीक्षण करताना परीक्षक श्री . मंगेश कुडले यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि ऐतिहासिक माहितीच्या सादरीकरणाचे कौतुक केले.
मुख्याध्यापिका सौ .प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सर्वांना अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची आवड, देशभक्तीची भावना आणि सर्जनशील विचारशक्ती विकसित होण्यास निश्चितच मदत झाली.