आई माझी थोर
आई अनमोल
आई चरणी
जीव वाहिला
आई मध्ये देव
मी पाहिला
आई तुझ्यात
देव पाहिला
आई तुझ्या रूपात
गं देव पाहिला ||ध्रु ||
आई तुझ्या पुण्याईचा
अभंग रचला
आई तुझ्या थोरवीचा
अभंग रचला
आई तुझ्या त्यागाचा
मी अभंग रचला
आई वात्सल्याचं
तू गं रूप
वात्सल्याचं
तू गं रूप
तुझ्या छायेत
आम्ही सुखरूप,
आम्ही सारे
सुखरूप
तुझी सदा आस
आम्ही खावा घास
कधीकधी आमच्यासाठी
घडला तुला उपवास
आई घडला तुला गं
उपवास
आई तुझ्या अंगाई
गीताचा लळा लागला ||१||
तिन्ही लोकांची
तिन्ही देवांची
आईच्या प्रेमासाठी
धाव, आईच्या
प्रेमासाठी धाव
साऱ्या विश्वात
साऱ्या जगात
आईच मोठं नाव
आईचं मोठं नाव
आईचा जीव
बाळात गुंतला
आईचा जीव
लेकरात गुंतला ||२|
आईचा श्वास
आईचा ध्यास
लेकरांचे सुख
मुलांचे सुख
लेकरांच्या
भविष्यासाठी
आई झेलते
सारे दुःख
आई सोसते
सारे दुःख
मुलांच्या सुखासाठी
मुलांच्या भल्यासाठी
आईने देवाकडे
हात जोडला
आईने माथा
नमविला ||३||
© गीत : राघवेंद्र रामकृष्ण गणेशपुरे
शिक्षक डी.ई.एस.सेकंडरी शाळा, पुणे.