एच. ए. स्कूल प्राथमिक विभागात उत्साहात दिवाळी साजरी

शिक्षण विवेक    27-Oct-2025
Total Views |

एच. ए. स्कूल प्राथमिक विभागात उत्साहात दिवाळी साजरी...
 दिनांक 16 ऑक्टोबर 2025
डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक शाळेत आज उत्साह पूर्ण वातावरणात दिवाळी साजरी करण्यात आली. यासाठी संपूर्ण शाळा आकाश कंदील लावून सजविण्यात आली होती. प्रत्येक इयत्तेला दिवाळीचे दिवस वाटून देण्यात आले होते. कार्यक्रमात दिवाळीच्या वसुबारस , धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, पाडवा व भाऊबीज या प्रत्येक दिवसाचे महत्त्व , माहिती व नाट्यीकरण करून दाखविण्यात आले. यावेळी गांधी जयंती निमित्त घेण्यात आलेल्या हस्ताक्षर स्पर्धा व दिवाळीनिमित्त घेण्यात आलेल्या किल्ले स्पर्धा व रांगोळी स्पर्धा मधील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांच्या संकल्पनेतून , ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे , डॉ.श्री. विठ्ठल मोरे यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम यशस्वीपणे साजरा करण्यात आला.
कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांनी भेटकार्ड देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी आवाजाचे फटाके उडवणार नाही व ध्वनी प्रदूषण करणार नाही अशी विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. तसेच दिवाळीनिमित्त शाळेकडून सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमांमध्ये इयत्ता पहिली ते चौथी चे सर्व शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते.
वार्तांकन
सौ. शहनाझ हेब्बाळकर