रमणबाग प्रशालेत वृक्ष कट्टयावर वाचन करत विद्यार्थ्यांनी साजरा केला वाचन प्रेरणा दिन...

शिक्षण विवेक    27-Oct-2025
Total Views |

 वाचन प्रेरणा दिन...
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेमध्ये बुधवार दिनांक15 ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी. जे अब्दुल कलाम यांना त्यांच्या जयंती निमित्त तसेच आद्यग्रंथपाल रंगनाथन यांना वाचन प्रेरणा दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.ज्ञानवृक्षाला डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांचे कट आउटस फलस्वरूपात लावण्यात आले.या वृक्षाच्या छत्रछायेत उभारण्यात आलेल्या वाचन कट्टयावर वाचन करण्यात विद्यार्थी रममाण झाले होते.
उपमुख्याध्यापक जयंत टोले,कला शिक्षक अंजली मालुसरे,आशा गुरसाळे व अर्चना जाधव यांनी ही सजावट केली होती.तनय नाझिरकर याने वाचन गीत सादर केले तर अथर्व यावलकर याने वाचन प्रतिज्ञा सांगितली.अबीर पाटणकर याने चिंतन सादर केले. डॉक्टर अब्दुल कलाम यांचे इंग्रजी व मराठी भाषेतील सुविचार सुद्धा फलकावर लावण्यात आले होते. वाचन प्रेरणा दिनानिमित्त डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या विषयी माहिती सांगणारे शब्दकोडे स्पर्धा व निबंध लेखन स्पर्धा सुद्धा घेण्यात आली. प्रशालेच्या शाला समितीचे अध्यक्ष डॉक्टर शरद अगरखेडकर, मुख्याध्यापिका अनिता भोसले, पर्यवेक्षिका अंजली गोरे व मंजुषा शेलूकर यांच्या उपस्थितीत संपूर्ण कार्यक्रम झाला. दिनविशेष विभाग प्रमुख राधिका देशपांडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षक, शिक्षकेतर यांच्या मदतीने केले.