बाप

शिक्षण विवेक    28-Oct-2025
Total Views |

बाप
 
बाबांच्या पावलावर चालत आले मी,
प्रत्येक पाऊल पाहत आले मी..!
आजारी पडायची मी पण ,
त्रास त्यांना व्हायचा..!
ठेच मला लागायची पण,
जखम त्यांना व्हायची..!
मी जर कुठे खचले,
तर ते माझ्यासाठी खंबीर उभे रहायचे..!
असे आहेत माझे बाबा,
ज्यांच्या सारखे नसे कोणी..!
कु-तन्वी चंद्रकांत शिंदे
 ९ वी अ
शाळा- कन्याशाळा वाई