“अश्रुत रमाईच्या न्हावून मी निघालो
संकल्प सावित्रीमाईचे घेऊन मी निघालो
पदरात जिजाऊंच्या छायेत वाढलो मी
हे पुष्प गुंफितो मी ही वाट गुंफितो मी
अहिल्याबाई अभ्यासण्या विचार मांडतो मी”
    
   पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या विचारांचा जागर व्हावा, त्यांचा आदर्श आम्ही घ्यावा या उधात्त हेतूने आपल्यासमोर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हा विषय निबंध स्पर्धेसाठी  ठेवला असावा असं मला वाटतयं..  
‘न स्त्री स्वातंत्र्य अहर्ती’ या तत्वाला छेद देवून आजची स्त्री निर्माण झाली, या पाठीमागे खूप मोठा इतिहास आहे. प्रचंड संघर्षगाथा आहे मग त्या जिजाऊ असतील, अहिल्याबाई होळकर असतील, सावित्रीबाई असतील, पंडिता रमाबाई असतील. की अगदी अलीकडच्या सिंधुताई सपकाळ असतील.यांच्या संघर्षाने यांच्या कर्तुत्वाने स्त्रीयांना नवी ओळख मिळाली, तिचा पाय उंबऱ्याबाहेर पडला आणि तिने आकाशही पेललं, प्रत्येक क्षेत्रात स्व:तच अस्तित्व सिद्ध केलय हा इतिहास आहे..
   अहिल्याबाई होळकर यांचा कालखंड हा इ. स. १७०० चा काळ आहे. त्यांचा जन्म माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी ३१ मे १७२५ ला चोंडी जि, अहिल्यानगर येथे झाला आणि खंडेराव होळकर यांच्या समवेत संसारीक जीवनाला त्यांनी सुरुवात केली.
   त्या कालखंडामध्ये मुलीना फारस शिकवल जात नव्हत, तरीसुद्धा त्यांचा वडिलांनी त्यांना शिकवले. चांगले संस्कार त्यांच्यामध्ये पेरले, नवा विचार त्यांना दिला म्हणूनच त्यांनी होळकर घराण्याचे नाव इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी आपल्या कर्तूत्वाने नोंदवले. 
 कारण अहिल्यामाईंचे पती खंडेराव होळकर, कुम्हेर लढाईत वीरगती पावले. तेव्हा सती जायची प्रथा होती, म्हणजे नवऱ्याच्या चितेवर स्त्रीयांना जिवंत जाळले जायचे पण त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी त्यांच्यातील कर्तूत्व, प्रभावी नेतृत्व पहिलं होत, म्हणून त्यांनी अहिल्याबाई यांना सती जाऊ दिली नाही. 
    नंतरच्या काळात राज्यकारभाराची सर्व सूत्रे अहिल्याबाई यांच्या हातात आली, जवळपास ३०० वर्ष झाले. तरीसुद्धा आज आम्ही त्यांचे नाव मोठ्या आदराने घेतो, याचे नेमके कारण काय ?
‘ कर्मण्ये वाधिकारस्ते मां फलेषू कदाचन’
    या उक्तीप्रमाणे निस्वार्थ काम करणारी माणसं आपोआप प्रजेची होतात. इतिहासात नोंदवली जातात आणि असेच अहिल्यामाईचे कार्य होते. 
   अहिल्यांमाईने प्रजेला योग्य न्याय दिला, नदीवर बांध बांधले, पर्यावरणाचे संवर्धन केले, लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगीक धोरण आखले, मंदिराचा किल्यांचा जिर्णोद्धार केला, त्यामध्ये काशी, उज्जैन, नाशिक, परळी वैजनाथ, येथील मंदिराचा उल्लेख करता येईल. 
    त्या एकमेव स्त्री राज्यकर्त्या होत्या ज्यांनी पडदा प्रथा पाळली नाही, त्या काळामध्ये जनता दरबार त्यांनी भरवला, लोकांना समजून घेतले म्हणून त्या राजमाता आहेत. पुण्यश्लोक आहेत आमच्यासाठी आदर्श आहेत, आपल्या मृत्यूपर्यन्त म्हणजे १३ ऑगस्ट १७९५ पर्यंन्त त्यांनी राज्यकारभार सांभाळला.