न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेत खण्डेनवमी निमित्त माता पालकांचा गौरव

शिक्षण विवेक    03-Oct-2025
Total Views |

न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेत खण्डेनवमी निमित्त माता पालकांचा गौरव
खण्डेनवमी निमित्त न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेमध्ये विविध साहित्याचे पूजन बुधवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका गायत्री खडके, शाळा समिती अध्यक्ष डॉक्टर शरद अगरखेडकर हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनिता भोसले यांनी भारतीय संस्कृतीमध्ये कृतज्ञतेचे महत्व असल्यामुळे शैक्षणिक साहित्यांचे पूजन यानिमित्ताने करणे महत्त्वाचे आहे असे सांगितले. सर्व क्षेत्रात महिला उत्तम कार्य करत आहेत त्यामुळे सेवा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या माता पालकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नवरात्र उत्सवानिमित्त प्रशालेतील माता पालकांचा गौरव आयोजित करण्यात आला आहे, असे सांगितले.
सेवा क्षेत्रात कार्य करणाऱ्या सेवाव्रत्ती तसेच प्रशालेतील महिला स्वच्छता कर्मचारी अशा 20 माता पालकांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
नवरात्र म्हणजे आदिशक्तीचा उत्सव यानिमित्त संपूर्ण समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा आदरयुक्तच असला पाहिजे आणि न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेने माता पालकांचा हा गौरव करुन एक आदर्श समाजापुढे प्रस्थापित केलेला आहे असे गौरवोद्गार यावेळी त्यांनी काढले.
खंडे नवमी आणि दसरा या विषयी चिंतन प्रशालेतील शिक्षिका वैशाली कवडे यांनी सादर केले. महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त चिंतन प्रशालेतील विद्यार्थी अथर्व यावलकर याने सादर केले.
माता पालक श्रीमती श्रद्धा सिदीड आणि संगीता रणशिंगारे यांनी आपले मनोगत प्रातिनिधिक स्वरूपात व्यक्त केले.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय ऋचा कुलकर्णी यांनी करुन दिला. गौरवांकित माता पालकांची नावे
दिपाली चौघुले यांनी वाचली.
सूत्रसंचालन वैशाली भोकरे यांनी केले. नवरात्रीनिमित्त देवीचा गोंधळ प्रशालेतील गानवृंदाने सादर केला.
ऋणनिर्देश पर्यवेक्षिका अंजली गोरे यांनी व्यक्त केले. तसेच व्यासपीठावर उपमुख्याध्यापक जयंत टोले, पर्यवेक्षक मंजुषा शेलूकर उपस्थित होते.