रविवारची सुट्टी होती. माझी आई कामाला गेली होती त्यामुळे मला घरातील सर्व कामे करावी लागणार होती. या सर्व काममध्ये माझ्याकडून एक भलीमोठी चूक होता होता वाचली. झाले असे की,  मी भाताचा कूकर लावायला घेतला - भात झाला, मी त्याची चव बघितली तर... तर माझ्याकडून भातात चुकून मीठ जास्त पडले होते. त्यामुळे भात खारट लागत होता, मला काहीच सूचेना. माझी तर पळता भूई थोडी झाली.
   तेवढ्यात माझे बाबा स्वयंपाक घरात आले. त्यांनी माझ्या चेहऱ्याच्या
हावभावावरून विचारले, “काय झाले, तू इतकी का घाबरली आहेस ?”
मी बाबांना सगळे सांगून टाकले. बाबा म्हणाले ' अगं मग घाबरतीयेस का ? मी तुला त्यावर एक उपाय सांगतो,  हे बघ. दोन बटाटे घे, आणि त्या बटाट्याचे छोटे-छोटे तुकडे करून तो भात थोडावेळ शिजव.” मी बाबांनी सांगितले तसे केले आणि खरंच भातातले मिठाचे प्रमाण कमी झाले- मी बाबांना विचारले की, “हे कसे झाले?” बाबांनी उत्तर दिले, ते म्हणाले की, “बटाट्यामध्ये स्टार्च असते, जे अतिरिक्त मीठ शोषून घेते. त्यामुळे जर आपण एखाद्या अन्नपदार्थात बटाट्याचे तुकडे घातले आणि ते शिजवले, तर बटाटा
अन्नपदार्थांमधील काही प्रमाणात मीठ स्वतः मध्ये शोषून घेतो आणि
चव खारट होण्यापासून वाचवतो, बटाटा हे स्पंजप्रमाणे काम करते. आहे की नाही गंमत?”
नाव :- स्वरांजली गंगाधर भगत
इयत्ता :- ९ वी ड
शाळा:- महिलाश्रम हायस्कूल, कर्वेनगर पुणे.