न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेमध्ये जर्मन भाषा विभागातर्फे DSD (जर्मन भाषा पदविका) A1 आणि A2 या स्तरांचा पारितोषिक वितरण समारंभ

न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेमध्ये जर्मन भाषा विभागातर्फे DSD (जर्मन भाषा पदविका) A1 आणि A2 या स्तरांचा पारितोषिक वितरण समारंभ

शिक्षण विवेक    04-Oct-2025
Total Views |

paritoshik vitaran samarambh
 
शनिवार, दिनांक ४ ऑक्टोबर रोजी न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेमध्ये जर्मन भाषा विभागातर्फे DSD (जर्मन भाषा पदविका) A1 आणि A2 या स्तरांचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला.
त्यामध्ये ZfA (The Central Agency for German Schools Abroad) या जर्मनीतील संस्थेच्या DSD (जर्मन भाषा पदविका)च्या A1 आणि A2 या परीक्षांची प्रशस्तिपत्रे प्रमुख अतिथी एरिक राऊ, मुख्याध्यापक आणि आना हान, समन्वयक हेल्मबुंड शूलं, जर्मनी तसेच ZfA व डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या समन्वयक डॉ. सविता केळकर या तिघांच्या हस्ते दीडशे विद्यार्थ्यांना देण्यात आली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना ही प्रशस्तीपत्रे ZfA जर्मनीकडून देण्यात आली.
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग ही ZfA चे पदविका अभ्यासक्रम घेणाऱ्या भारतातील तीन शाळांपैकी एक शाळा आहे. यावर्षी रमणबाग प्रशालेस ZfA कडून एक लाख रुपये किंमतीचे शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमास रमणबाग शालासमितीचे अध्यक्ष डॉ. शरद अगरखेडकर, विनायक केळकर आणि फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्राध्यापिका श्वेता लढ्ढा तसेच रमणबाग प्रशालेच्या शालाप्रमुख अनिता भोसले, उपशालाप्रमुख जयंत टोले, पर्यवेक्षक अंजली गोरे व श्रीमती मंजुषा शेलूकर असे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रशालेच्या मुख्याध्यापक अनिता भोसले यांनी उपस्थितांचे भेटवस्तू देऊन स्वागत केले. डॉ. सविता केळकर यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉ. सविता केळकर यांनी विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे महत्त्व सांगून ती भाषा शिकण्यास प्रोत्साहन दिले.
श्री.एरिक राऊ यांनी अनेक भाषा अवगत आहेत म्हणून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि सर्व भाषा समान संदेश देतात असे सांगितले. आना हान यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.
या कार्यक्रमाचे नियोजन व आभारप्रदर्शन जर्मन विभाग प्रमुख स्नेहल बुद्धिहाळ यांनी केले. सूत्रसंचालन रमणबाग जर्मन भाषा मार्गदर्शक शारदा जोशी यांनी केले.