श्रावणाच्या सरींनी निसर्ग हा नटला
सुंदर साजिरा रंगांनी श्रावण आला,
पानां- फुलांनी सजले हे सणवार,
संतत बरसणारी ही श्रावणधार,
उठले जलतरंग पान पान झाले धुंद,
रिमझिम श्रावणधारांनी दरवळला ऋतुगंध,
हळूच सूर्याने टिपले दव पावसाच्या सरीचे,
आभाळी रंगले.... इंद्रधनु सप्तरंगाचे....
सौ. पुनम सागर खंडागळे
पालक, नविन मराठी शाळा.