दि.१५ ऑक्टोबर २०२५ रोजी प्राथमिक विद्यामंदिर ,काटेमानिवली, कल्याण (पू.) शाळेत भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त अर्थात 'वाचन प्रेरणा दिनाचे' औचित्य साधून शिक्षणविवेक आयोजित काव्यअभिवाचन स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपन्न झाला.
या स्पर्धेत इ.१ली ते ४थी चे ८०विद्यार्थी आणि २६ पालक अशा एकूण १०६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. समारंभास चित्रा जाधव (माजी शिक्षिका) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन प्रज्ञा घनघाव यांनी केले. तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने आणि शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योत्स्ना पाटील यांच्या उत्तम मार्गदर्शनाने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.