शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेत माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती, तसेच भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या प्रतिमांचे पूजन शालाप्रमुख अनिता भोसले व पर्यवेक्षिका अंजली गोरे यांनी केले. शिक्षिका दिपाली सावंत यांनी बाल दिनाबाबत तर आठवीतील विद्यार्थी हिमांशू साळी याने बिरसा मुंडा यांच्याबाबत माहिती सांगितली. संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षक हर्षद गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाने 'ठाकर गीताचे' गायन केले. नाट्यविभाग प्रमुख रवींद्र सातपुते यांनी लेखन व दिग्दर्शन केलेल्या बिरसा मुंडा यांच्यावरील नाटिकेचे सादरीकरण नाट्य विभागातील विद्यार्थ्यांनी केले.
बालदिनानिमित्त गमतीदार खेळ,टॅटू काढणे,गोष्टी,गाणी,नृत्य, लघुपट असे विविध उपक्रम राबवण्यात आले.विद्यार्थ्यांनी या सर्व उपक्रमात सहभागी होऊन मौज मजा व मस्ती केली.बाल दिनाचे नियोजन दिनविशेष विभागाच्या प्रमुख राधिका देशपांडे यांनी केले. बिरसा मुंडा यांच्या जन्मशताब्दी निमित्त प्रशालेत जनजाती गौरव पंधरवडा साजरा करण्यात आला. चित्रकला,निबंध,वक्तृत्व गटचर्चा,नृत्य,गीतगायन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.