सौ विमलाबाई गरवारे प्रशालेत बालदिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा…

शिक्षण विवेक    20-Nov-2025
Total Views |
baldin
   बालदिनाच्या उत्सवाचे औचित्य साधून सोमवार, दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ रोजी
म. ए. सो. च्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत गीत–गायनाचा भव्य व प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाला बाल शिक्षण मंदिर, भांडारकर रोड मुख्याध्यापिका खेडलेकर मॅडम, प्रशालेचे मा. मुख्याध्यापक भारमळ सर, उपमुख्याध्यापिका गायकवाड मॅडम, पर्यवेक्षिका सौ. शिंदे मॅडम शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बाल शिक्षण मंदिर चे विद्यार्थी
तसेच प्रशालेचे इयत्ता 5 वी ते 8 वीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. पाचवीतील विद्यार्थिनींनी अत्यंत सुरेल आवाजात ईशस्तवन आणि स्वागतगीत सादर करून वातावरण मंगलमय केले. मान्यवरांचे स्वागत करून मुख्याध्यापक भारमळ सरांनी बालदिनाचे महत्त्व सांगत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
   यानंतर मुख्य आकर्षण असलेल्या गीत–गायन कार्यक्रमास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने बालगीते, गवळणी, पोवाडा, ‘सुंदर माझी शाळा’, ‘दिल है छोटासा’, ‘पसायदान’, राज्यगीत अशा विविध प्रकारच्या गीतांचे मनमोहक सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या सुमधुर आवाजामुळे संपूर्ण सभागृहात आनंदाची लहर पसरली.
   कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी व मान्यवरांनी ‘वंदे मातरम्’ सामूहिकरीत्या गायले.
प्रशालेच्या शिक्षिका स्वप्नाली देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले व
यशदा देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले . विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
हा गीत–गायन कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमधील कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यात आले .
बालदिन मोठया उत्साहात आनंदात व धमाल मस्तीत संपन्न झाला .