‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पोस्टर चित्रकला स्पर्धेचे आयोजन !

शिक्षण विवेक    20-Nov-2025
Total Views |

poster and drawing competition
   
   पुणे, दि. 19/11/25:
 
   ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने Archaeological Survey of India (ASI), मुंबई सर्कल आणि Indus Compass यांच्या संयुक्त विद्यमाने पोस्टर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात पुणे शहरातील न्यू इंग्लिश मिडीयम स्कुल शाळेमधील इयत्ता 7 वी आणि 8 वी च्या सकाळ आणि दुपार विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
   कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वंदे मातरम्, स्वातंत्र्याच्या चळवळीतील त्याचे योगदान, तसेच भारताच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारी विविध पोस्टर्स साकारली. देशभक्ती, एकता, स्वातंत्र्य संग्रामातील बलिदाने आणि भारताच्या समृद्ध परंपरा या विषयांची प्रभावी मांडणी त्यांच्या चित्रांमधून दिसून आली.
   उद्घाटनप्रसंगी लेखक तसेच वंदे मातरम चे तज्ञ मिलिंद सबनीस यांनी विद्यार्थ्यांना ‘वंदे मातरम्’ चे ऐतिहासिक महत्त्व आणि राष्ट्रनिष्ठा दृढ करणारा संदेश दिला. तसेच Indus Compass तर्फे विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची प्रशंसा करण्यात आली.
   स्पर्धेतील उत्कृष्ट पोस्टर्सचे प्रदर्शनही करण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चित्रकलेतील प्रतिभेला वाव मिळाला तसेच राष्ट्रगीताविषयी आदर, अभिमान आणि ऐतिहासिक दृष्टिकोन विकसित करण्याचा हेतू साध्य झाला.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पार्थ भेंडेकर तसेच आभार प्रदर्शन सागरिका राजूरकर यांनी केले