आरोग्य संकटे व आजीचा संकटनाशक बटवा..

शिक्षण विवेक    27-Nov-2025
Total Views |

आरोग्य संकटे व आजीचा संकटनाशक बटवा..
आजी:- या मुलांनो, या या.
मुले:- आलो आम्ही आजी, आलो.
राज:- हे बघ ना आजी सारंगला खोकला झालाय, तरीही तो औषध घेत नाही आहे; सांग ना त्याला.
आजी:- का रे सारंग बाळा, तू औषध प्यायला का नाही म्हणतो आहेस?
सारंगः- कारण ते खोकल्याचे औषध खूप कडू असते.
आजी:- ठिक आहे. मग मी तुला एक गंमत देते.
सारंगः- काय आजी ?
आजी:- ओळख बघू, लाल-लाल फळ.
सारंग:- डाळींब ?
आजी :- बरोबर! घे घे.!!
सारंग:- अरे वा ! मला डाळींब खूप आवडतात. पण ह्याच्याने मला
येणारा खोकला थांबेल का?
आजीः- हो. नक्की थांबेल.
सारंग:- किती बरं झालं, आता मला औषध घ्यावं लागणार नाही.
स्वराः- आई गं, आई गं.
स्नेहाः- अरे बापरे! तुला किती जखम झालीये, रक्तपण येतय.
आजीः- कशी धडपडलीस तू ? रेवा जा बघू पटकन् हळद आण.
रेखाः- हो, हे घे.
आजी:- स्वरा, ही हळद लाव बघू तुझ्या पायाला पटकन्.
स्वराः- रक्तस्त्राव थांबला पण, बघ ना.
आजी:- आता तुझी जखम लवकरच भरेल.
राजः- अगं, आजकालच्या जगात आईबाबांना खूप कामाचा तणाव येतो. यावर काही उपाय आहे का आजी? म्हणजे
ते धड जेवतही नाहीत.
आजी:- यावर देखील चांगला उपाय आहे.
राजः- सांग ना आजी.
आजी:- अळू ही भूक वाढवणाऱ्या थंड पदार्थांपैकी आहे..
राजु:- फक्त एवढेच?
आजी:- हो. यासाठी डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासत नाही. अरे सारंग काल तू का आला नव्हतास?
सारंग:- अगं आजी मला काल खूप ताप भरला होता. बरं झालं की आम्हाला उपाय सापडला नाहीतर आई-बाबांची नुसती धावपळ चालू होती.
आजी:- मग काय उपाय सापडला?
सारंग:- आईला उपाय एका पुस्तकातून सापडला. त्यात गुळवेलच्या रसाची विधी होती. ती विधी आईने नीट वाचली आणि लगेच माझ्यावर तो उपाय केला. गुळवेल रसामुळे माझा ताप लगेच उतरला.
आजी:- हो गुळवेल आहेच तेवढा गुणकारी.
मुले:- आजी, बुद्धी तल्लख करण्यासाठी काही उपाय आहे का?
आजी:- हो. आहे की! हिरड्याची पूड तुपात घालून रोज एक चमचा खायची. आणि अभ्यासही करायचा. वेदांची तयारी चांगली
मुले :- अगं आजी आज तर तू आम्हाला आयुर्वेदाची चांगली माहिती दिली.
आजी:- हे प्रथमोपचार झाले पण आवश्यकता वाटल्यास मोठ्यांचे ऐका व दवाखान्यात नक्की जा
 
 
नाव :- दिपाली रविंद्र उपासनी
इयत्ता :- ८ वी तुकडी:- ड
शाळा :- महिलाश्रम हायस्कूल कर्वेनगर पुणे-५२