
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेत शनिवार दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी हिंदी दिन साजरा करण्यात आला.महान हिंदी साहित्यिक प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. इयत्ता पाचवी यलोच्या विद्यार्थ्यांनी हिंदी गीत गायले.राष्ट्रभाषा हिंदीचे महत्व पर्यवेक्षिका अंजली गोरे यांनी प्रास्ताविकातून सांगितले.हिंदी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चित्ररुप गोष्टी, कविता ,प्रसिद्ध हिंदी साहित्यिकांची माहिती सांगणारे तक्ते,भेटकार्ड,जाहिराती ,कोडी, आकर्षक कागदी पिशव्या,हिंदी व्याकरणावरील विविध शैक्षणिक साहित्य यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख अतिथी व प्रशालेच्या माजी शिक्षिका श्रीमती शुभदा देशपांडे यांनी केले.रवींद्र सातपुते व उमेश सपकाळ या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी प्रदर्शन मांडणी केली.हिंदी दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी कोडी तयार करणे,जाहिरात लेखन,निबंधलेखन या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.मातृभाषा मराठी बरोबर राष्ट्रभाषा हिंदीचाही विद्यार्थ्यांनी सन्मान करावा.हिंदी भाषेचा अभ्यास करुन तिचे सौंदर्य विद्यार्थ्यांनी समजून घ्यावे असे मार्गदर्शन शुभदा देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना केले.विद्यार्थ्यांनी हिंदी कविता वाचन, पर्यावरण गीत, झाडांचे महत्त्व, प्रकृतीचे महत्त्व इत्यादी कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अथर्व यावलकर व अवनीश जवळेकर या विद्यार्थ्यांनी केले. गीतांजली सरडे यांनी अतिथींचा परिचय करून दिला तर सुवर्णा केदारी यांनी आभार मानले.चंद्रशेखर कोष्टी यांनी काव्यवाचन केले.
मुख्याध्यापिका अनिता भोसले, उपमुख्याध्यापक जयंत टोले पर्यवेक्षिका अंजली गोरे व मंजूषा
शेलूकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.