म .ए .सो . भावे प्राथमिक शाळेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

शिक्षण विवेक    01-Dec-2025
Total Views |

mes vardhapan din...
      महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा वर्धापन दिन दिनांक १९ नोव्हेंबर रोजी म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक वामन प्रभाकर भावे, वासुदेव बळवंत फडके आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांच्या प्रतिमांचे पूजन मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संस्थेच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. शाळेच्या आवारात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाला शाळेचे माजी शिक्षक व माजी विद्यार्थीही उपस्थित होते. त्यांनी आजच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून शाळेतील आठवणी सांगितल्या .
      विद्यार्थ्यांनी यावेळी उत्साहपूर्वक म . ए . सो . गीत सादर केले. मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका वृषाली ठकार यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.