आंतरशालेय नाट्यछटा स्पर्धा 2025 संपन्न

शिक्षण विवेक    11-Dec-2025
Total Views |
 
bsps
 
   शिक्षण विवेक अंतर्गत आयोजित आंतरशालेय नाट्यछटा स्पर्धा इ.5 वी ते 7 वी या गटातून घेण्यात आली.या स्पर्धेत एकूण 16 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यातून अंतिम फेरीसाठी 7 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी पंढरीची वारी, पाण्याची बचत, मोबाईल अशा विविध विषयातून अभिनयाद्वारे विनोद आणि मार्मिकता यांचे दर्शन घडवले.
स्पर्धेसाठी जेष्ठ शिक्षिका गायत्री संदिकर बाई व सुनिता सोनवणे बाई परिक्षक म्हणून लाभल्या. गायत्री बाईंनी सर्व स्पर्धकांना सुरूवातीला निकष समजावून सांगितले व विद्यार्थ्यांच्या अभिनयाचे कौतुक केले. तसेच सर्वांना मार्गदर्शन केले. सोनवणे बाईंनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला. तसेच पाठांतर व अभिनय याची सांगड कशी असावी याचे मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापक मा. सोनवणे सर यांनी स्पर्धकांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले.
निकाल =
🥇कु.संध्या सचिन वारकड- प्रथम
🥈चि.यश उत्तरेश्वर डाके -द्वितीय
🥉कु.आदिती धम्मानंद सोनवणे-तृतीय
उत्तेजनार्थ =1.राजश्री दत्ता सुरवसे
2.वंश विजय मुळे
अशाप्रकारे अत्यंत उत्साहात नाट्यछटा स्पर्धा संपन्न झाली.