गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिन प्रशालेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन कॉलेजमधील सेवानिवृत्त इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख जयंत खेडकर तर शाळासमितीचे वित्तनियंत्रक, गणिताचे नामवंत प्राध्यापक डॉक्टर विनयकुमार आचार्य, शाळा समिती अध्यक्ष डॉक्टर शरद अगरखेडकर हे मान्यवर उपस्थित होते.
गणित हा सोपा विषय असून गणिताची भीती घालवण्यासाठी आपण मूलभूत संज्ञा समजून घ्यायला हव्यात आणि सराव करायला हवा, असे मार्गदर्शन प्रमुख पाहुणे जयंत खेडकर यांनी केले.
पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या मूलभूत गणितीय संकल्पना स्पष्ट होण्यासाठी गणिताच्या शिक्षकांनी तयार केलेल्या कृतिपुस्तिकेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
गणिताच्या तासाला शिक्षकांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रतिकृती, मॉडेल्स, भौमितिक रचना यांच्या वापर करुन तयार केलेली भव्य गणितीय प्रतिकृती शाळेच्या फरसबंद चौकात साकारण्यात आली.
यासाठी सर्व गणित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापक अनिता भोसले यांनी केले,प्रमुख पाहुण्यांचा परिचय सारिका रणदिवे यांनी करुन दिला . योगेश पडदुणे यांनी विद्यार्थ्यांना गणित दिवसाचे महत्त्व सांगितले, सूत्रसंचालन दीप्ती डोळे यांनी केले, तर सर्व कार्यक्रमाचे नियोजन व आभार प्रदर्शन गणित विषय प्रमुख प्रतिभा वडनेरकर यांनी केले.
यावेळी प्रशालेच्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन ध्वजारोहणाने करण्यात आले.
व्यासपीठावर उपमुख्याध्यापक जयंत टोले, पर्यवेक्षक अंजली गोरे , मंजुषा शेलूकर,वार्षिक स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष राजेंद्र पवार, कार्योपाध्यक्ष ऋचा कुलकर्णी, शिक्षक प्रतिनिधी प्रतिभा जक्का उपस्थित होते.