पुणे : येथील डी.ई.एस.सेकंडरी शाळेत दिनांक १ ते ६ डिसेंबर २०२५ या दरम्यान सकाळ व दुपार विभागाच्या वतीने क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा सप्ताहाचा बक्षीस वितरण समारंभ आज दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी शाळेच्या सभागृहामध्ये घेण्यात आला. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका विजया जोशी, उपमुख्याध्यापिका लक्ष्मी मालेपाटी, पर्यवेक्षिका राधा केतकर, काजल चौधरी शारीरिक शिक्षण शिक्षक, शिक्षिका आदी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना सादर केली.या क्रीडा सप्ताहामध्ये इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी लंगडी, डॉज बॉल, रिंग गोल स्टिक, लगोरी, फुटबॉल व फूट क्रिकेट, शिक्षक शिक्षकांसाठी रस्सीखेच स्पर्धा खेळाचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा सप्ताहामध्ये विविध खेळ प्रकारात यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका,
उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, शिक्षक, शिक्षिका यांच्या हस्ते प्रमाणपत्र, मेडल देण्यात आले. या वेळी शाळेतील खेळामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या हाऊसला पारितोषिक देण्यात आले.यामध्ये प्रथम क्रमांक ग्रीन हाऊस ( सकाळ विभाग)व येलो हाऊस (दुपार विभाग) यांना मिळाला.प्रथम स्थानावर असलेल्या ग्रीन व येलो हाऊस मधील कॅप्टन, व्हाईस कॅप्टन, शिक्षकांना मुख्याध्यापिका विजया जोशी यांच्या हस्ते ट्रॉफी देण्यात आली.विजया जोशी यांनी क्रीडा सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन ईशा लिखिते, रूपाली काळभोर तर आभार मंजुषा भोसले, माधुरी मेहता यांनी मानले.
यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका विजया जोशी यांच्या मार्गदर्शनात, उपमुख्याध्यापिका,पर्यवेक्षिका, शारीरिक शिक्षण शिक्षिका सुनेत्रा वेदपाठक, शिक्षक सचिन घाडगे, प्रवीण जाधव, शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदींनी परिश्रम घेतले.