दि. 18 डिसेंबर 2025 व 19 डिसेंबर 2025 रोजी कार्यक्रमाची सुरुवात नटराज व सरस्वती पूजन करून गणेश वंदनाने करण्यात आली.
कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. आनंद देशमुख ( सचिव चिन्मय मिशन पिंपरी चिंचवड), मा.श्री. शशांक फाळके ( Managing Director, SPA Projects, India private Limited) लाभले होते. तसेच साईनाथ बालक मंदिर संस्थापिका मा. सौ. बेलसरे, जिल्हा कार्यवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपरी चिंचवड मा.श्री. नरेंद्र पेंडसे,यमुनानगर प्रभागातील माजी नगरसेवक मा. प्रा. श्री.उत्तमजी केंदळे,मा.सौ. सुमनताई पवळे मा. मुख्याध्यपिका सौ. पल्लवी शानभाग( SPM इंग्रजी माध्यम ),शाळेच्या पालक चिटणीस मा. सौ.मंजुश्री अनुशे, पालक प्रतिनिधी मा. श्री.सोपान मेकले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रस रंग व गंध मराठी मातीचा ही कार्यक्रमाची संकल्पना घेवून विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करीत नृत्याविष्कार सादर केले.
प्रमुख पाहूणे मा. श्री. आनंद देशमुख यांनी आपण आपल्या जीवनामध्ये एकदा तरी भगवद्गीता व ज्ञानेश्वरी वाचावी व त्याचे अनुकरण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करावे म्हणजे आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळेल व जीवनाचे सार्थक होईल असे उपयुक्त मार्गदर्शन सर्वांना केले .तसेच मा. श्री शशांक फाळके यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून आपल्या पाल्यासाठी मातृभाषेतून शिक्षण निवडले याबद्दल सर्वप्रथम सर्व पालकांचे कौतुक केले व आपण कोणते क्षेत्र निवडताना आपल्या पाल्याची शास्त्रीय दृष्ट्या त्या क्षेत्रातील आवड व क्षेत्रातून त्याला मिळणारा आनंद पालकांनी जोपासावी याबद्दल सर्वांना मार्गदर्शन केले.
स्नेहसंमेलनाच्या औचित्य साधून शाळेतील कला व क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.
शाळा समिती अध्यक्ष मा.ॲड दामोदरजी भंडारी यांच्या प्रेरणेतून मा. मुख्याध्यापिका सविता बिराजदार(मराठी माध्यम), यांच्या मार्गदर्शनाने तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय प्रसन्न व आनंददायी वातावरणात संपन्न झाला.