संकटकाळातील प्रयोग

शिक्षण विवेक    06-Dec-2025
Total Views |

sankat kalatil prayog 
      संकट काळातील प्रयोग म्हणजे अचानक ओढावलेल्या कठीण प्रसंगावर प्रसंगावधान दाखवत त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी केलेले प्रयत्न.
      संकटकाळ कधीही, केव्हाही आणि कोठेही अचानकपणे आपल्या समोर येऊ शकतो. ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसेल अशा स्थितीमध्ये आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सर्वप्रथम, आपल्या मानसिक स्थैर्य राखणे गरजेचे असते. मग ते संकट छोटे असो किंवा मोठे मानसिक स्थिती डगमगू न देता संकट समयी आपल्याला जे प्रथमोपचार त्वरित सहज शक्य असतील ते करणे गरजेचे असते. त्याच बरोबर समाजातील घटकांची मदत घेणे फायद्याचे ठरते. अर्थात सर्व गोष्टी शांत आणि संयामानेच सहज शक्य होतात.
      तर अचानक आलेल्या संकटावर प्रयोग करणे याचा अनुभव मला नुकताच आठ दिवसांपूर्वीच मिळाला. रविवार दि. ३१ ऑगस्ट २०२५ गौरी आवाहनाचा दिवस त्यादिवशी सकाळी लवकरच माझे आई, बाबा सकाळी ७ वाजता मार्केटयार्ड ला गेले. भाजी, फळे फुले अशा खरेदीसाठी. घरी मी, माझा लहान भाऊ, आणि माझी आजी आम्ही आम्ही तिघे होतो. माझा, लहान भाऊ आणि मी स्वयंपाकघरात नाष्टा करत होतो. इतक्यात आजीच्या खोलीतून धपकन काहीतरी पडण्याचा आवाज आला.. त्यावेळी माझा भाऊ व मी नाष्टा सरकावत आजीच्या खोलीकडे धावलो. पाहतो तर काय ! आजी खूर्ची वरून खाली जमिनीवर पडली होती. त्याचाच आवाज होता तो. आजी खूर्चीवर उभं राहून घरातील देवांच्या फोटोंना हार घालत होती. हार घालून झाल्यावर खाली उतरत असतानाच तिचा तोल गेला, आणि खुर्ची घसरली. आणि आजी जोरात फरशीवर आदळली.
      आजी ज्या खुर्चीवरून पडली ती खुर्ची बाजूला करत मी आणि माझा भाऊ आम्ही दोघांनी आजीला उचलून बेडवर बसवले. जोरात पडल्यामुळे आजीच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता व जखम झाली होती; आणि त्या जखमेतून भरपूर रक्त येत होतं. सुरुवातीला मलाच काही समजेना काय करावे. मग वेळ न घालवता मी आईला फोन केला व घटना सांगितली. आईने सांगितलं, कापूस घेऊन त्यावर डेटॉल लावून आजीच्या जखमेवर धरून ठेवा त्याने रक्त लवकर गोठते. आईने सांगितल्या प्रमाणे, मी कृती केली. माझ्या लहान भावाने पटकन स्वयंपाक घरात जाऊन एनर्जी ड्रिंक बनवले आणि ते आजीला प्यायला दिले. आणि माझ्या भावाच्या ह्या छोट्याश्या उपायामुळे माझ्या आजीला थोडे बरे वाटले. नंतर कापसाचे तीन-चार बोळे बदलल्यानंतर जखमेतून रक्त येणे थांबले. आई बाबा ही त्वरित घरी आले आणि आजीला दवाखान्यामध्ये घेऊन गेले.
      आता तसे पाहायला गेलो तर ही गोष्ट आहे छोटीशीच पण त्या दिवशी प्रसंगावधान दाखवणे गरजेचे होते. कारण माझ्या आजीला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे आणि घरी कोणीही नसताना हा प्रसंग अचानक माझ्यावर ओढवला.
आई-बाबा गेले होते, आम्हा बहीण भावाला आजीच्या भरवश्यावर सोडून कारण आजी आहे, ती आम्हा दोघांची काळजी घेईल. पण झाले उलटेच आजी पडल्यामुळे आम्हालाच तिची काळजी घ्यावी लागली. हास्याचा हा भाग वेगळा आहे. परंतु त्या दिवशी माझ्या लहान भावाने आणि मी घाबरून न जाता आजीची व्यवस्थित काळजी घेतली आणि संकटावर मात करण्याचा छोटासा प्रयत्न केला. मानसिक स्वास्थ्य बिघडू न देता. तर मित्र- मैत्रिणिंनो संकटांना कठीण प्रसंगी तुम्हीही असे धैर्य दाखवा.
धन्यवाद!
 
नाव- शरण्या दुष्यंत जावळकर 
इ- ८ वी  तुकडी-
शाळेचे नाव- महिलाश्रम हायस्कूल