डेक्कन एज्युकेशन सोसायटीची नवीन मराठी शाळा सातारा येथे वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.आर.वाय. जाधव अध्यक्ष कोल्हापूर विभागीय शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी तिसरी व चौथीच्या कब-बुलबुल पथकाने मान्यवरांना मानवंदना दिली. विविध खेळात प्राविण्य मिळवणाऱ्या शाळेच्या उत्कृष्ट खेळाडूंच्या हस्ते क्रीडा ज्योतीचे आगमन झाले. विद्यार्थ्यांनी साहित्य कवायत, सूर्यनमस्कार यांची प्रात्यक्षिके सादर केली. बालवयामध्येच व्यायामाचा संस्कार आणि शिस्तीची सवय अंगी बाणवली पाहिजे असे प्रतिपादन आर वाय जाधव यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांसाठी धावणे, कोनातून नागमोडी धावणे, अडथळा शर्यत इत्यादी खेळांच्या वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या तसेच बैठा गोल खो-खो, डॉजबॉल, लंगडी पळती या खेळांचे सांघिक सामने उत्साही वातावरणात संपन्न झाले.शाला समितीचे अध्यक्ष मा. सारंग कोल्हापुरे यांच्या हस्ते सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. विजयी व उपविजयी संघांना फिरती ढाल देऊन तसेच सर्व खेळातील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी न्यू इंग्लिश स्कूल सातारा येथील पर्यवेक्षक मा. श्रीनिवास कल्याणकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मा. शितल घाटगे उपाध्यक्ष मा. निखिल पानसरे हे मान्यवर उपस्थित होते मा. शालाप्रमुख तनुजा तिकोने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. रेहाना डांगे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. खेळ विभाग प्रमुख म्हणून मंगल साळुंखे यांनी काम पाहिले. क्रीडा महोत्सवाच्या यशस्वितेसाठी मनिषा चव्हाण, सारिका लामकाने, गणेश बाबर तसेच सर्व शिक्षक वृंद, लेखनिक, संगणक विभाग, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. सीमा घाटगे व मंगल साळुंखे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शिक्षक प्रतिनिधी मनिषा चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांनी क्रीडा महोत्सवाचा आनंद घेतला.
मुख्याध्यापिका
नवीन मराठी शाळा सातारा