शैक्षणिक वर्ष २०२५-२६ व त्यापुढे पूर्वीप्रमाणेच नियमित पाठ्यपुस्तके वह्यांच्या पानांशिवाय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत - शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे

योजनेचा अपेक्षित उद्देश साध्य न झाल्याणे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ आणि त्या पुढे पूर्वीप्रमाणेच नियमित पाठ्यपुस्तके वह्यांच्या पानांशिवाय उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत

शिक्षण विवेक    10-Feb-2025
Total Views |


2025-26 

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ त्यापुढे पूर्वीप्रमाणेच नियमित पाठ्यपुस्तके वह्यांच्या पानांशिवाय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्यात इयत्ता री ते वी च्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची कोरी पाने जोडण्याची योजना रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. योजनेचा अपेक्षित उद्देश साध्य झाल्याणे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ आणि त्या पुढे पूर्वीप्रमाणेच नियमित पाठ्यपुस्तके वह्यांच्या पानांशिवाय उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शिक्षण शिक्षणाचे साहित्य त्यांचे सार्वत्रिकरण व्हावे, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचावी, पाठ्यपुस्तके वह्या यांच्या वजनाने दप्तराचे ओझे वाढते , दप्तराच्या वजनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतात, गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेत शिकायला जाताना पुरेसे लेखन साहित्य उपलब्ध नसते; या सर्व मुद्यांचा विचार करून शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून इयत्ता री ते इयत्ता वी च्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट करण्याबाबतचा निर्णय मागील शासनाने घेतला होता.

परंतु, बालभारतीच्या संचालकांनी यासंदर्भात शासनाच्या असे निदर्शनास आणून दिले की, सदर योजनेचा आढावा घेतला असता, पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या वह्यांच्या कोऱ्या पानांचा विद्यार्थ्यांकडून शिकविलेल्या घटकांच्या नोंदी घेण्यासाठी अपेक्षेप्रमाणे उपयोग झाल्याचे दिसून आले नाही. तसेच सदर योजनेचा उद्देश हा दप्तराचे ओझे कमी करणे असा होता, परंतु विद्यार्थी पुस्तके सोबत वह्या देखील घेऊन येत असल्याचे तसेच पाठ्यपुस्तकांमधील कोऱ्या पानांचा शैक्षणिक नोंदी घेण्याकरिता वापर होत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सदर योजनेचा अपेक्षित उद्देश फारशा प्रमाणात सफल झाल्याचे दिसून आले नाही.

ही वस्तुस्थिती विचारात घेऊन, दिनांक ०८ मार्च २०२३ रोजीचा शासन निर्णय रद्द करून दिनांक २८ जानेवारी २०२५ रोजी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ त्यापुढे पूर्वीप्रमाणेच नियमित पाठ्यपुस्तके वह्यांच्या पानांशिवाय उपलब्ध करून देण्यात यावीत असा निर्णय शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी घेतला आहे.