महामराठी प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२५

शिक्षण विवेक    12-Feb-2025
Total Views |


महामराठी प्रश्नमंजुषा 

नमस्कार,

‘मराठी भाषेची सकारात्मक चळवळ’, हे मुख्य उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून ‘शिक्षणविवेक’ आणि ‘श्री. मुकुंद भवन ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने मातृभाषा संवर्धनासाठी मराठी राजभाषादिनानिमित्त इ.५वी ते इ.१० वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि खुल्या गटासाठी ऑनलाइन महामराठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Ø स्पर्धेसंबंधी माहिती :

सदर स्पर्धा तीन गटात घेतली जाईल,

१) इ.५वी ते इ.७वी

२) इ.८वी ते इ.१०वी

३) खुला गट

वस्तुनिष्ठ स्वरूपाचे २५ प्रश्‍न सोडवायचे आहेत.

Ø नियम-

१) एका व्यक्तीला एकदाच प्रश्नमंजुषा सोडवता येईल.

२) एकापेक्षा जास्त वेळा सोडवेलेल्या प्रश्नमंजुषेतील पहिल्या पेपरचेच गुण ग्राह्य धरले जातील.

Ø स्पर्धेचा कालावधी :

१९ फेब्रुवारी सकाळी १० ते २४ फेब्रुवारी सकाळी १० वाजेपर्यंत.

अधिक माहितीसाठी : ८३७८०८७९९४, ७३७८८३२४६७