सावधान..! ज्या परीक्षा केंद्रावर गैमार्गाचे प्रकार आढळतील, त्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार

ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या परीक्षा केंद्राची केंद्र मान्यता पुढील वर्षापासून रद्द करण्यात येणार आहे. याबाबतचा मोठा निर्णय बोर्डाकडून जाहीर करण्यात आला.

शिक्षण विवेक    05-Feb-2025
Total Views |


exam centre 

फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या दहावी बारावी बोर्ड परीक्षेदरम्यान ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या परीक्षा केंद्राची केंद्र मान्यता पुढील वर्षापासून रद्द करण्यात येणार आहे. याबाबतचा मोठा निर्णय बोर्डाकडून जाहीर करण्यात आला.

कोरोना काळातील सन २०२१ सन २०२२ या दोन परीक्षा वगळून मागील वर्षांच्या म्हणजेच फेब्रुवारी-मार्च २०१८, २०१९, २०२०, २०२३ २०२४ या परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून आलेली आहेत अशा परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक अन्य कर्मचान्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा/उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक कर्मचाऱ्यांमधून करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

शासनाने काढलेल्या आदेशात काय म्हटलं?

फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या . १० वी . १२ वी परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्रांची परीक्षा केंद्रमान्यता पुढील वर्षीपासून कायमची रद्द करण्यात येईल. दोन्ही बाबीशिवाय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांना त्यांच्या जिल्हयात . १० वी . १२ वीची परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी आवश्यकते प्रमाणे नियोजन करण्याची मुभा राहिल. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सदस्य सचिव दक्षता समिती, विभागीय मंडळे यांनी मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांच्या सहकार्याने परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक कार्यरत राहील तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर भरारी पथकांच्या भेटी होतील याचे नियोजन केले जाणार आहे.